Author : Rajendraprasad S. Masurkar
Publisher : Kokan Media (Sattwashree Prakashan)
ISBN 13 : 8195639119
Total Pages : 100 pages
Book Rating : 4.1/5 (956 download)
Book Synopsis The Geeta in Leisure by : Rajendraprasad S. Masurkar
Download or read book The Geeta in Leisure written by Rajendraprasad S. Masurkar and published by Kokan Media (Sattwashree Prakashan). This book was released on 2022-12-03 with total page 100 pages. Available in PDF, EPUB and Kindle. Book excerpt: 'Zopalyawarchi Geeta' is the summarization of Shrimad Bhagvadgeeta in lucid Marathi language. It was first published in 1917 by Shankar Narhar Joshi's Chitrashala Press in Pune. At that time, it's price was only four annas. In 2015, this rare book was compiled & republished by Sattwashree Prakashan in Ratnagiri. Now, we are very happy to publish it's English translation by Mr. Rajendraprasad Masurkar. ........ मानवी जीवनाचं सार सांगितलेला श्रीमद्भगवद्गीता हा महान ग्रंथ जाणून घ्यायचे, अभ्यासायचे प्रयत्न युगानुयुगे सुरू आहेत; मात्र प्रत्येक वेळी गीता वाचताना, अभ्यासताना त्यातील नवे अर्थ, त्याचे वैविध्यपूर्ण पैलू, पूर्वी न कळलेले आयाम समोर येतात, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. संस्कृत अर्थात गीर्वाणवाणीतलं हे ज्ञान सर्वांना उमजावं, याकरिता विनोबांनी सुगम मराठीत गीताईची रचना केली आणि ती घराघरात पोहोचली; मात्र त्याआधीही गीतेतलं तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या मराठी भाषेत मांडलं होतं ते दत्तात्रेय अनंत आपटे अर्थात अनंततनय यांनी. त्यांनी इसवी सन १९१७मध्ये म्हणजे आजपासून १०३ वर्षांपूर्वी ‘झोंपाळ्यावरची गीता’ ही रचना त्यांनी केली होती. पूर्वी मुलींची लग्नं वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी होत. चैत्रगौरीच्या निमित्ताने त्या माहेरी येत, त्या वेळी झाडांना किंवा अंगणात झुले (झोपाळे) बांधून त्यावर त्यांचे खेळ चालत. त्या वेळी वेगवेगळी गाणी म्हटली जात. त्याबरोबरच या मुलींनी गीता म्हटली तर लहान वयात त्यांना चांगलं ज्ञान मिळू शकेल, असा विचार पुढे आला; पण संस्कृतातली गीता म्हणणं तसं अवघड होतं. त्यामुळे गीतेची अत्यंत सोप्या भाषेत रचना करून त्याला ‘झोंपाळ्यावरची गीता’ असं नाव दिलं गेलं. अनिकेत कोनकर यांना त्यांचे आजोबा कै. बा. के. करंबेळकर गुरुजी यांच्या संग्रहात २०१०मध्ये ‘झोंपाळ्यावरची गीता’ ही दुर्मीळ पुस्तिका सापडली. त्यातली लेखकाच्या नावासह काही पानं गहाळ झालेली होती. वृत्तपत्रात लेख, स्वतंत्र वेबसाइटनिर्मिती आदी माध्यमांतून लोकांना आवाहन करून ती गहाळ पानं शोधण्यात यश आलं. (दिवंगत) बालसाहित्यकार सरिता पदकी यांनी त्यांच्या संग्रहातून ती पानं उपलब्ध करून दिली. त्यानंतर ती वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली. एक ऑगस्ट २०१५ रोजी रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे (कोकण मीडिया) ‘झोंपाळ्यावरची गीता’ पुस्तकरूपानं प्रकाशित करण्यात आली. आता रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद स. मसुरकर यांनी केलेला या झोंपाळ्यावरच्या गीतेचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध करत आहोत. (३ डिसेंबर २०२२ - गीता जयंती) अनंततनय यांनी केलेली झोपाळ्यावरच्या गीतेची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिला गेयता तर आहेच; पण भाषा सोपी असली, तर कमी शब्दांत बराच अर्थ सांगणारी आहे. विनोबांची गीताई हा श्रीमद्भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद आहे. झोंपाळ्यावरची गीता मात्र समश्लोकी नाही. त्यातल्या अध्यायांची श्लोकसंख्या मूळ संस्कृत श्लोकांपेक्षा काही ठिकाणी कमी, तर काही ठिकाणी जास्त आहे. गीतेत ७००, तर झोंपाळ्यावरच्या गीतेत ५४६ श्लोक आहेत. मराठी भाषेचं सौंदर्य वेगळ्या पद्धतीनं यातून प्रतीत झालं आहे. ...... The Geeta in Leisure (English Translation of Marathi Book ‘Zopalyawarchi Geeta’) Original Marathi Author: Dattatreya Anant Apte alias Anantatanay (1917) Author (English Translator) : Rajendraprasad Sakharam Masurkar 1242, Lanjekar Compound, Golap, Tal. & Dist. Ratnagiri-415616 Mobile : 9960245601. Email : [email protected] Editor : Aniket Balkrishna Konkar Email : [email protected] Mobile : 9850880119, 9423292162 Published by: Balkrishna Vishnu Konkar (Pramod Konkar) Sattwashree Prakashan (Kokan Media Consultancy & Services) Kusumsudha, 697, Ramchandra Nagar (Shree Nagar), Opp. All India Radio Relay Station,Behind Gandhi Automobiles, At./Post Khedshi, Tal. & Dist. Ratnagiri-415639 Mobile : 9422382621, 9822255621 Email : [email protected] Website: kokanmedia.in Sketch on Cover: Narendra Dhamanaskar, Mumbai Design: Mangesh More (Ratnagiri), Dr. Mihir Prabhudesai (Sawantwadi) Please contact to publisher for Printed Book. Price: Rs. 200/- Copyright © Author and Publisher : Mr. Rajendraprasad Sakharam Masurkar and Balkrishna Vishnu Konkar (Pramod Konkar)